अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्कार प्रदान

Update: 2021-11-08 13:02 GMT

चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेली अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्काराने गौरवलं गेलं. राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी कंगनाला पद्मश्री पुरस्काराने गौरवलं गेलं. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी कंगना सोनेरी रंगाची सिल्क साड़ी परीधान करून दिल्लीला पोहोचली होती. या विशेष दिनी तिची धाकटी बहीण रंगोली चंदेला सुध्दा तिच्या सोबत हजर होती.

पुरस्कार केला महिलांना समर्पित

या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना कंगना म्हणाली, "मी आनंद आणि गौरवास्पद अनुभव घेत आहे. मी आपल्या देशाचे या पुरस्काराबद्दल धन्यवाद व्यक्त करते आणि हा पुरस्कार स्वप्न पाहण्याची हिंमत पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला अर्पित करते."

हे पुरस्कार 2020 मध्ये उत्कृष्ट कार्य करणयासाठी दिले जात आहेत. तर 2021 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 119 लोकांना मंगळवारी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कोणत्याही क्षेत्रात विशिष्ट सेवेसाठी 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवीत केलं जातं. हा देशाचा चौथा सर्वात मोठा पुरस्कार आहे. कंगनाला सिनेक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला गेला आहे.

काही दिवसांपूर्वीच कंगना रणौत ला राष्ट्रीय पूरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. कंगना ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'पंगा' या चित्रपटातील अभिनयासाठी मिळाला होता.

Tags:    

Similar News