पुण्यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कंगना रणौत विरुद्ध तक्रार दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. कंगना रणौत ने एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्य बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यामुळे कंगना विरोधात ती तक्रार दाखल करण्यात आली असून यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली आहे.
फक्त पुण्यातच नाही तर Headline : कंगना रणौत विरोधात गुन्हा दाखल...आप आणि राष्ट्रवादीने घेतला पुढाकार to @MumbaiPolice requesting action on Kangana Ranaut for her seditious and inflammatory statements on @TimesNow, under sections 504, 505 and 124A.
Hope to see some action @CPMumbaiPolice @DGPMaharashtra pic.twitter.com/9WxFXJFnEn
— Preeti Sharma Menon (@PreetiSMenon) November 11, 2021
नेमकं काय आहे प्रकरण?
अभिनेत्री कंगना रणौत अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा अनेक वक्तव्य करून कंगनाने स्वतःवर वाद ओढवून घेतलेले आहेत. परंतु आता कंगनाने देशाच्या स्वातंत्र्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. त्यामुळे तिच्यावर चोहोबाजूंनी टीकेचा भडीमार होतोय. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये कंगनाने बोलताना, "1947 साली जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं ते स्वातंत्र्य नसून ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे आपल्याला 2014 साली मिळालं आहे", असं वक्तव्य केलं आहे.