Mumbai Covid Scam : किशोर पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल...

Update: 2023-08-05 11:03 GMT

 मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोविड सेंटर मधील कथित घोटाळ्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी केली जात होती. आणि आता प्राथमिक चौकशीनंतर किशोरी पेडणेकर यांच्यासह पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आगरीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोविड काळात मुंबई महापालिकेने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे त्यावेळी काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचं अंमलबजावणी संचालनालय (ED) म्हणणं आहे. यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग असल्याचं ईडीन म्हटल होतं. त्यामुळे या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांच्यासह दोगाजनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोटाळ्याचा आरोप नक्की काय...

मुंबईत कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६ हजार ८०० रुपयांना खरेदी केल्याचं आरोप त्यावेळच्या विरोधी पक्षाने केला होता. यावेळी किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर होत्या. आणि त्यांच्या सूचनेनुसारच हे टेंडर देण्यात आल्याचा आरोप झाला होता.

Tags:    

Similar News