६५ वर्षीय हसीना अहमद यांचा १८ वर्षांचा वनवास अखेर संपला, पाकिस्तानने केली सुटका!
उत्तर प्रदेशातील सहारनपूर, नवाब का किला या परिसरात राहाणाऱ्या हसीना दिलशाद अहमद या २००२ पासून पाकिस्तानच्या कारागृहात बंदीस्त होत्या. पाकिस्तान सरकार नेमची त्यांच्या क्रुर कृत्यांसाठी ओळखलं जातं. विशेषतः भारतीय लोकांशी पाकिस्तान सरकारचं विशेष वैर आहे. आणि हेच वैर दिसलं ते हसीना दिलशाद अहमद यांच्यासोबत. हसीना या २००२ साली पाकिस्तानच्या लाहोर शहरात त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. मात्र तिथे गेल्यावर त्यांना त्यांचे नातेवाईक भेटले नाहीत. नातेवाईक न भेटल्याने त्या लाहोर शहरात एकट्याच भटकत राहिल्या त्यामुळे त्यांना संशयित घोषित करून पाकिस्तान सरकारनं बंदी बनवून तुरुंगात डांबलं.
हसीना या उत्तर प्रदेशातील सहारनपूर, नवाब का किला या परिसरात राहातात. त्यांच्या विवाह दिलशाद अहमद यांच्याशी झाला होता. हसीना या पाकिस्तानात गेल्या तेव्हा ४७ वर्षांच्या होत्या, त्यांची तब्बल १८ वर्षांनी पाकिस्तानच्या कारगृह रुपी वनवासातून सुटका झाल्यानंतर त्या वयाच्या ६५व्या वर्षी मायदेशी भारतात परतल्या आहेत. त्यांनी या सुटकेनंतर भारतात आल्यावर "मी माझ्या घरी स्वर्गात परत आलेय" अशी प्रतिक्रीया दिली आहे.
२००२ पासून तुरुंगात असलेल्या हसीना यांची पाकिस्तानच्या कारागृहातून २० डिसेंबर रोजी सुटका झाल्यानंतर त्या थेट अमृतसरमध्ये दाखल झाल्या आहेत. अमृतसर येथील गुरू नानकदेव रुग्णालयाच्या धर्मशाळेत त्या मुक्कामाला होत्या. अमृतसरच्या पोलीसांनी हसीना यांच्याकडून माहिती घेऊन त्यांचे भाचे जैनुद्दीन चिश्ती यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना उत्तर प्रदेशातील औरंगाबाद शहरात पोहचवले आहे. पोलीसांच्या पुढाकाराने आज हसीना आपल्या घरी पोहचल्या असून, त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
हसीना यांचा वनवास पाहिल्यानंतर बजरंगी भाईजान चित्रपटाची आठवण येते. चुकून भारतात राहीलेल्या मुलीला पाकिस्तानात सोडण्यासाठी बजरंगी किती मेहनत घेतो. विविध मार्गाने त्या चिमुकल्या मुन्नीला तिच्या आईशी भेटवण्याचे प्रयत्न करतो, आणि भेटवतोही. एक भारतीय आपली भूमिका अगदी चोख बजावतो. पण पाकिस्तान असं करत नाही. हसीना यांचा १८ वर्षांचा वनवास आज कुठे तरी संपला, मात्र भारताचे अजून एक सुपूत्र कुलभूषण जाधव अजुनही पाकिस्तानच्या कारागृहात बंधिस्त आहेत.
पाकिस्तान भारताविरोधात कुरापती करण्यास एक पाऊल मागे राहात नाही. पण जेव्हा पाकिस्तानी सैन्याचे जवान भारताने कैद केले होते, तेव्हा पाकिस्तानच्या विनंतीवर त्यांना सहज सोडण्यात आले होते. पण पाकिस्तानच्या मनात इतकं औदार्य नाही.