60 वर्षीय आजोंबाच्या लग्नाची राज्यभर चर्चा

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्याच्या शिंदोडी येथील 60 वर्षीय आजोंबाच्या लग्नाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. शिंदोडीच्या 60 वर्षीय ताबा चिमाजी कुदनर या आजोंबांनी 40 वर्षीय सुमन तबा कुदनर यांच्याशी विवाह केला आहे.

Update: 2021-07-31 12:56 GMT

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्याच्या शिंदोडी येथील 60 वर्षीय आजोंबाच्या लग्नाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. शिंदोडीच्या 60 वर्षीय ताबा चिमाजी कुदनर या आजोंबांनी 40 वर्षीय सुमन तबा कुदनर यांच्याशी विवाह केला आहे.

60 वर्षीय ताबा चिमाजी कुदनर यांच्या पहिल्या पत्नीचे एक वर्षापूर्वी निधन झाले. यातच त्यांच्या मुलीचे हि लग्न झाले. त्यामुळे घरामध्ये ते एकटेच होते. त्यामुळे त्यांच्या खाण्या- पिण्याची, कपडे धुण्याचे, तसेच इतरही दैनंदिन कामांचे हाल होतं होते. त्यामुळे त्यांच्या मुलीने व मित्रपरिवाराने त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. सुरूवातीला समाज काय म्हणेल?, हे काय लग्नाचे वय आहे आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांनी त्यांना भांडावून सोडले मात्र त्यानंतर मित्र परिवार आणि मुलीच्या आग्रहाखातर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आणि त्यांनी सुमनबाईंसोबत विधीवत लग्न केले.

सुमनबाई या 40 वर्षांच्या आहेत. सुमनबाई यांनी आपल्या आई- वडिलांच्या इच्छेनुसार व माझ्या स्वखुशीने हे लग्न करत असल्याचे सांगितले. मी या लग्नापासून आनंदित आहे असंही सुमनबाई यांनी म्हटलं आहे. आयुष्याची असा टप्प्यावर पुन्हा या दोघांना जोडीदार मिळाल्याने दोघेही आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.


Tags:    

Similar News