राज्यात कोरोनाबधितांचा आकडा वाढला...
काल दिवसभरात कोरोनाबाधित रुगणांच्या संख्येत वाढ झाली असली तरी यातून बरे होणाऱ्यांची प्रमाण देखील जास्त आहे.;
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी जास्त होत आहे. सोमवार पासून राज्यातील अनेक ठिकाणचे निर्बंध राज्य सरकारने शिथिल केले आहेत. त्यानंतर काल गुरुवारी राज्यात नवीन 6 हजार 559 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 7 हजार 120 बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 120 कोरोनाबधित मृत्यू झाले आहेत. राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2 टक्के इतका आहे.
आजपर्यंत एकूण 61 लाख 24 हजार 278 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकंदरीतच सध्या राज्यातील रुग्णबरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के एवढे आहे. असे असेल तरी अजूनही दुसरी लाट कमी होताना दिसत नाहीये. राज्यात अनेक ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.