5 वर्षाच्या मुलीची बलाक्तार करुन हत्या, न्यायासाठी वडीलांचा विधानभवना बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
नयागड जिल्ह्यातील एका दाम्पत्याने आज ओडिशा विधानबवनाच्या मुख्य गेटसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, या जोडप्याने स्वतःवर रॉकेल ओतून स्वत: ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता विधानसभेबाहेर तैनात पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रॉकेलची बाटली आणि एक मॅचबॉक्स जप्त केली. नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
जुलै महिन्यात त्यांच्या ५ वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली नाही, असे या महिलेचे आणि तिच्या पतीचे म्हणणे आहे. सध्या राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाला राज्यातील सर्व आमदार उपस्थित असतात. त्यांचे लक्ष वेधूनघेण्यासाठी या दाम्पत्याने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे.