तीनशे महिलांना सॅनिटरी पॅड वाटण्यात आले , खरंतर ही समाजात एक नवी क्रांती घडवणारी गोष्ट आहे ,महिलांना सॅनिटरी पॅड नक्की वाटले कोणी ? कोण आहेत या व्यक्ती ? चला पाहूयात
28 मे ला जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो आणि याचंच निमित्त साधत भाकर फाउंडेशनचे संस्थापक दीपक सोनवणे यांनी 300 महिलांना सॅनिटरी पॅड वाटले आहेत
इतकच नाही तर मासिक पाळी दिनाचे महत्त्व काय आहे ? आरोग्याची काळजी कशी घ्यायची? मासिक पाळी बद्दल असणारे गैरसमज ... रूढी ,परंपरा गैरसमज या सर्व विषयांवर मार्गदर्शन सुद्धा केले आहे.
भाकर फाउंडेशनचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे . या उपक्रमांतर्गत अनेक महिला मासिक पाळी विषयी जागृत होतील आणि चांगल्या रीतीने स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करतील .गोरेगाव येथे भगतसिंग नगर, येथील या तीनशे असंघटित महिला कामगार ,एकल महिला तसेच मुलींना या उपक्रमात सहभागी करून घेतलं होतं.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल की कशा पद्धतीने दीपक सोनवणे आणि त्यांच्या टीमने मासिक पाळी बद्दल जागृती निर्माण केले आहे, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ... हे आम्हाला कळवायला विसरू नका आणि अश्याच नवनवीन व्हिडिओज साठी मॅक्स वुमन ला सबस्क्राईब करायला ही विसरू नका...