संतापजनक : पारोळ्यात सामुहिक अत्याचार करुन दलित तरुणीची हत्या नातेवाईकांचा आरोप
पारोळा येथे दलित तरुणीचा मृत्यू, सामुहिक अत्याचार करुन तरुणीची हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप.., नक्की काय आहे प्रकरण वाचा
दलित तरुणीवर सामूहिक अत्याचार करून विष देऊन खून केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे घडली आहे. टोळी तालुका पारोळा येथील एका वीस वर्षाच्या तरूणीवर गुंगीचे औषध देऊन चौघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार करुन तिला विष पाजून तिला मारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पारोळा येथे दिवाळीसाठी मामा कडे आलेली 20 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली होती. तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार पारोळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. काही तरुणांनी कुटीर रुग्णालयात दाखल केल्यानंतर पीडिता गंभीर असल्याने नातेवाईकांनी वैद्यकीय उपचारार्थ तिला धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पीडित तरुणी शुद्धीवर आल्यावर पारोळा तालुक्यातील टोळी येथील शिवनंदन पवार, पप्पू पाटील, अशोक पाटील, यांनी अपहरण करून अत्याचार केल्याची फिर्यादित नमूद केली आहे. दरम्यान उपचार सुरू असताना आज तिचा मृत्यू झाला. तिच्यावर सामूहिक अत्याचार केले व नंतर तिला विष पाजून मारण्यात आलं असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.
मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी कुटुंबाने तसंच सामाजिक संघटनांनी केली आहे. या संदर्भात पारोळा पोलीस स्टेशनला मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.पारोळा येथे दलित तरुणीचा मृत्यू, सामुहिक अत्याचार करुन तरुणीची हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप.., नक्की काय आहे प्रकरण वाचा