गेल्या 24 तासात पुणे पुणे जिल्ह्यातील कोरोनाचे 165 नवीन रुग्ण आढळलेले आहेत. तर पुणे शहरातील 156 नवीन रुग्ण आढळलेले आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये 3, काँन्टोमेन्ट आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये 1 आणि पुणे ग्रामीणमध्ये 5 नवे कोरोना रुग्ण आढळलेले आहेत.
त्यामुळे पुणे जिल्ह्यात आता कोरोनाचे एकूण रुग्ण 3 हजार 134 झाले आहेत. यापैकी 2725 रुग्ण एकट्या पुणे शहरात आहेत. तर पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णांची संख्या 173 झाली आहे. तर पुणे जिल्ह्यातील 116 कोरोनाबाधीत रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. पुणे महानगरपालिका हद्दीतील 107, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील 2 आणि पुणे ग्रामीण 7 रुग्णांचा यात समावेश आहे,
हे ही वाचा
संकर्षण कऱ्हाडेची अस्सल मराठवाडी भाषेतील कविता, ‘शंक्या.. काहीही व्हायलंय बे हे’
#AatmanirbharBharat: नरेंद्र मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज
पुणे जिल्ह्यातील कोरोना अपडेट
जिल्ह्याती एकूण मृत्यू - 168
पुणे शहर - 149
पिंपरी चिंचवड - 07
पुणे ग्रामीण भागातील मृत्यू संख्या - 12
पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1358
पुणे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 1205
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 108
काँटोन्मेन्ट, नगरपालिका आणि ग्रामीण हद्दीतील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 45