तो'चा 'ती' होते आणि 'ती'चा 'तो'होतो तेव्हा...

शाम चा शामली होने व शामली चा शाम होने हा शरीरातील बदल आहे. तो बदल त्या व्यक्तीला आयुष्यभर सहन करावा लागतो. खरतर हा बदल एखाद्याच्या आयुष्यात झाला तर समाज त्याला तितक्या सहजतेने स्वीकारत नाही. समाजाकडून मोठी अवहेलना त्यांना सहन करावी लागते. तृतीयपंथी चे शारीरिक मानसिक भावनिक आर्थिक आणि लैंगिक प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. तृतीयपंथी समाजाच्या अनेक गोष्टींवर, प्रश्नांवर प्रकाश टाकणारा दिलशाद मुजावर यांचा महत्वपूर्ण लेख आम्ही पुन्हा प्रकाशित करीत आहोत नक्की वाचा...;

Update: 2022-09-24 15:37 GMT

आजही समाजामध्ये तृतीयपंथी बद्दल वेगवेगळ्या भावना आहेत ,आणि प्रत्येकाला त्याचा विश्वास जाणून घ्यायचं असतं, प्रत्येकाला समजून घ्यायचे असते  तृतीयपंथी म्हणजे काय पण तृतीयपंथी असणं हे त्या व्यक्तीच्या हातातील गोष्ट नाही विशिष्ट  हार्मोनल चेंजेस झाले मुळे अशा पद्धतीचे लोक आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात .

  एका संवेदनशील लहान मुलांचं भावविश्व बदलून जातं तो"  चा "ती "होते," ती "चा "तो "होतो आणि मग त्यांच्या आयुष्याची घालमेल सुरू होते, शाम चा शामली होने व शामली चा शाम होने  हे जे शरीराच् ट्रान्सफॉर्मेशन आहे, हा शरीरातील बदल आहे तो बदल यांना आयुष्यभर सहन करावा लागतो .

आणि मग समाजात  होणाऱ्या प्रत्येक अवहेलना ला त्यांना सामोरं जावं लागतं, काही समजत नाही काही उमजत नाही काही समजण्याच्या काही उमजना च्या कालखंडामध्ये त्यांच्यावर अनेक अमानुष पद्धतीने त्यांचा वापर केला जातो ,बऱ्याच गोष्टींना त्यांच्या विरोधात काम करावं लागतं आणि अशा या तृतीयपंथी समाजाला जेव्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे पण चर्चा करतो , समाजाच्या मध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सुद्धा जाणून घेणे फार महत्वाचे  आहेत,

  2014  नालसा जजमेंट आल आणि यांचा जन्म झाला असा पण म्हणतो , नालसा जजमेंट ने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्याला ओबीसी आरक्षण दिलं ,पण आजही हा शिक्षणापासून पूर्णतः वंचित  घटक आहे ,आणि या समाजाला शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं हे खरं तर त्यांना नालसा जजमेंट यांनी दिलेल्या निकालाचा महत्त्वाचं पाऊल आहे ,पण तरीदेखील राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या गोष्टी आज ही  होताना दिसत नाहीत .

आणि त्यामुळे पारंपारिक गोष्टींमध्येच आजही हा समाज अडकलेला आहे आजही या समाजाला आपण दुर्लक्षित उपेक्षित घटक म्हणूनच पाहतो आज समाजामध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धती आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तृतीयपंथी ना  सहज आपण लक्ष्य करू शकतो त्यांना टार्गेट बनऊ  शकतो, आणि त्यामुळे त्यांचा वापर हा बऱ्याच गोष्टींसाठी केला जातो 2014 च्या नालसा जजमेन्ट ने राज्य सरकार व केंद्र सरकार याना खुप तरतूदि सांगितल्या पण त्याच्या कुठल्याही गोष्टींचा अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला गेला नाही,

   भारतामध्ये  विचार केला गेला तर केरळ , तमिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रचार आणि प्रसार होताना आपल्याला दिसतो ,पण महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्र मध्ये अजूनही तृतीयपंथी हा एखाद्या सर्कशीतल्या प्राण्यांसारखा आहे रस्त्याने जाताना कुतूहलाने आपण एखाद्या प्राण्याकडे बघत राहतो तसे तृतीयपंथी कड़े आपण पाहत राहतो, आणि त्यामुळे या समुहा विषयी आजही समाजामध्ये गैरसमज खूप आहेत, हे लोक बहुरूपी आहेत असं काही लोकांचं म्हणणं आहे , आणि त्यामुळे बऱ्याच जणावर  अत्याचार होताना आपण पाहतो,

  आज स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना देखील या समाजाला स्वतःच्या अस्तित्वाचा लढा स्वतःच्या संघर्षासाठी , माणूस म्हणून लढा समजून घ्या,आम्हाला स्वीकारा म्हणून आक्रोश करावा लागतं आहे, या एकाच गोष्टीसाठी त्यांना झगडावे लागते ,याच्यामध्ये जस स्त्री पुरुषाना जगण्यासाठी  जसे की अन्न वस्त्र निवारा शिक्षण या मूलभूत गरजा  लागतात ,यांना सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत ,

  पण या सगळ्यापासून आपण त्यांना वंचित ठेवले जाते,  तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना जेव्हा त्याच्यामध्ये हार्मोन्स बदलतात तेव्हा त्यालाही कळत नाही की नेमके त्याच्या शरीरामध्ये काय बदल होत आहेत, अश्या परिस्थितीमध्ये त्याला घरचे स्वीकारत नाहीत त्याला घरातून बाहेर जावं लागतं, आणि त्याचा खरा  संघर्ष तिथेच सुरू होतो कारण आकाश आणि फक्त जमीन एवढंच अस्त ,बाकी अंधार

आणि मग समुदाय त्याला स्वीकारतो, समुदाय सोबत तो  राहायला लागतो आणि मग सेक्सवर्कर ,भीक मागणं याव्यतिरिक्त त्याला पर्याय राहत नाही,  शाळांमध्येसुद्धा आपल्या शिक्षकांना ,विद्यार्थ्यांना gender sensatisation नसल्यामुळे या गोष्टी त्यांच्याही लक्षात येत नाहीत, आणि तिथे त्याची अवहेलना सुरू होते आणि सुरुवात घरापासून होते, पण  घराने त्याला स्वीकारल तर कदाचित या गोष्टीने त्यांना सामोरे जावे लागणार नाही ,पण सुरुवात घरापासून होते "लोग क्या कहेंगे" या लाजेखातर अशा मुलांना  घरापासून दूर केलं जातं मग शिक्षणाचा अभाव होतो, आणि मग  ते मोठे व्हायला लागतात समाजाचे रूढी परंपरा त्यांच्यावर लादल्या जायला लागतात, आणि त्यांना तू फक्त उपभोगाची वस्तू आहे तुझा वापरच केला जाऊ शकतो हे बिंबवलं जातं, आणि मग ते त्याचा सूड उगवायला सुरुवात करतात ही खरी शोकांतिका आहे,

   राज्यघटनेच्या कलम 14 आणि 15 प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला समान न्याय तत्त्वानुसार जगण्याचा अधिकार आहे पण इथं  त्यांच्या बाबतीत होताना दिसत नाही,  प्रत्येक जण त्याला स्वतःच्या दृष्टिने बघत असतो, कुणाला तो बहुरुपिया वाटतो कुणाला तो तो एक सेक्स वर्क करणारा, किंवा भीक मागणारा ,व्यक्ती वाटतो बरेच गोष्टी  मुळे त्यांच्या भावना दुखावल्या जातात, हे आज समाजाचं चित्र आहे पण समाजाचा विचार करताआज राजकीय इच्छाशक्ती सुद्धा तेवढीच प्रबळ नाही , असं दिसून येतं कारण जोवर राजकीय इच्छाशक्ती प्रबळ होत नाही तोपर्यंत या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येताना बऱ्याच अडचणीत आहेत,

   आणि आज या समाजाला मुख्य प्रवाहात येणे ही काळाची गरज आहे का आज जनगणनेनुसार काही कोटींमध्ये भारतामध्ये यांची संख्या आहेत असं म्हटलं जातं, आज नॅशनल पोर्टल त्यांच्यासाठी स्थापन केले की जिथे त्यांची नोंद करणे गरजेचे आहे, पण या नोंदीच्या संदर्भात सुद्धा काही अडचणी आज रोजी सगळ्यांच्या लक्षात येत आहेत, त्यामुळे नोंदी होताना दिसत नाहीत, त्यामुळं आज हा समाज या सगळ्या न्याय हक्का पासून दूर आहे ,

  लिंगभाव हा समाज घडवत असतो आपण कसं वागावं आपण काय कपडे घालावेत कोणी कसं वागावं हे समाज ठरवत असतो, आणि त्यामुळे ह्या तृतीयपंथींना जगणं माणसाच्या प्रवाहात राहून त्याच्या नियमानुसार जगणं हे फार अवघड कधीकधी अवघड होऊन जातं कारण त्यांचा तो आक्रोश असतो .

त्यामुळे आज विचार करत असताना तृतीयपंथीं च्या जीवन पद्धतीचा अभ्यास करणे महत्त्वाचे तृतीयपंथीयांच्या सामाजिक व आर्थिक दर्जाचा विचार करणे गरजेचे तृतीयपंथी मानवी हक्क पासून कसे वंचित आहेत तसेच होते, पण त्यांना पालक ,पोलीस समाजातील सर्व स्तरातील लोक कसे वागतात याची माहिती करून घेणे गरजेचे आहे , त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या कोणत्या योजना ,कायदे आहेत याचे मूल्यमापन होणे गरजेचे आहेत .तिथे पण त्यांच्या मानवी हक्कांची जपणूक व्हावी त्यांना माणूस म्हणून जगता यावे यासाठी उपाययोजना करणं फार गरज आहे.

त्याचप्रमाणे जर ह्या तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांच्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे उदाहरणार्थ त्यांना जोपर्यंत आपण शिक्षण देत नाही तोपर्यंत त्यांना ह्या समाजाच्या मुख्य प्रवाहात येताना खूप अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

   आणि त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक भावनिक त्यांचा विकास होणे आणि त्याला पूरक वातावरण असणे हे फार गरजेचे आहे त्याचप्रमाणे तृतीयपंथी साठी स्वच्छता स्नानगृहे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे , समाज बहिष्कृत करत तेंव्हा स्वतंत्र निवारा ,वृद्धाश्रम असणे गरजेच आहे , तृतीयपंथी के पालकांच्या बरोबर संबंध बिघडतात त्यांना एकत्रितपणे राहता यावं त्यामुळे  पालकांना प्रशिक्षित करणं त्याचप्रमाणे त्यांना  त्यांच्या विषयी माहिती देणे हे फार गरजेचे आहे

त्याचप्रमाणे सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये तृतीयपंथींना मोफत सुविधा पुरवील्या जाणे महत्वाचे आहे,नालसा जजमेंट ने देखील याविषयी सूचना राज्य सरकार आणि केंद्र सरकार नाकेलेले आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर,त्याना मदत करणारी यंत्रणा याना तृतीयपंथीयांच्या स समस्येविषयी त्यांना संवेदनक्षम बनवणं फार गरजेचे आहे

तसेच पोलिसांच्या मध्ये सुद्धा यांच्याबाबत जागृति  करण गरजेचे आहे ,आणि पोलिसांना यांचे  प्रश्न आणि त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या काही गोष्टींची माहिती नसते, त्यामुळे त्यांच्याशी वागत असताना एक सामंजस्याने आणि एक माणुसकी म्हणून त्यांच्याकडे बघून त्यांच्याशी व्यवहार करणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यांचेही प्रबोधन होणे गरजेचे आहे ,संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना ,महात्मा फुले आरोग्य योजना , पूरक पोषण आहार योजना तसेच  ओळखपत्र मतदार ओळख पत्र या सर्व योजनांचा लाभ देणे गरजेचे आहे .

तृतीयपंथी म्हणजे काय त्यांचे शास्त्रीय व्याख्या शासनाने या क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते वैद्यकीय तज्ञ समुपदेशक समाजशास्त्र व मानसशास्त्र यांच्या सहकार्याने करणे गरजेचे आहे

त्याचप्रमाणे तृतीयपंथी हा माणूस आहे त्याच्या मानवी हक्काचे जोपासना होईल त्याच्या मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता सर्व स्तरावर राजकीय ,शासकीय कार्यालये ,दवाखाने, शिक्षण क्षेत्र इथे होणे गरजेचे आहे तसेच त्यांचे प्रबोधन प्रसार माध्यम व मीडिया नाटक-सिनेमा दूरदर्शन बोधवाक्य पोस्टर्स आणि प्रशासनाद्वारे विविध पातळ्यांवर करणं गरजेचे आहे ,

तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण करणारा कायदा अस्तित्वात आला पण त्या अनुषंगाने त्याच्या

कामाची विभागणी होऊन त्या  मंडळाला योग्य ते अधिकार देणे हे सुद्धा महत्वाचा आहे. तृतीयपंथी चे शारीरिक मानसिक भावनिक आर्थिक आणि लैंगिक प्रश्न काय आहेत त्यांचा समाजातील दर्जा आणि जीवन पद्धती यावर प्रकाश टाकणारे सर्वेक्षण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आवश्यक आहे

लिंग बदल करण्यासाठी काही ऑपरेशन असतील तर ती कुठे आणि कसे सहज सुलभ केली जातील किंवा कमीत कमी पैशांमध्ये ती कशी करता येतील याविषयी समाज प्रबोधन होणे आणि त्यांना त्याची ती मिळणे गरजेचे आहे

त्याचप्रमाणं  शाळा-कॉलेजमध्ये जे तरुण तृतीयपंथी आहेत त्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट  करणे गरजेचे आहे, त्यासाठी कला कौशल्य त्यांना अवगत आहेत याचे ज्ञान देणे गरजेचे आहेत, विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमामध्ये बदल करणे गरजेचे आहेत. त्यांच्यासाठी वेगळी अभ्यास गट ,अभ्यासक्रम तयार होणे गरजेचे आहे विद्यापीठाच्या धर्तीवर याच्या मध्ये बदल करून घेणे गरजेचे आहे,

आज तृतीयपंथी ना घरा पासून दूर केल जात, त्यांमुळे property मध्ये हिस्सा दिला जात नाही, दत्तक घेता येत नाही, त्यासाठी Hindu Adoption and maintenance act व CARA नियम मध्ये बदल करने गरजेचे आहे,लग्न करणे चा अधिकार मिळाला पाहिजे, अन्न, वस्त्र,निवारा, आणि सहज स्वीकार त्याना मिळाला पाहिजे,

   त्याचप्रमाणे आज निवडणुकांमध्ये सुद्धा तृतीयपंथींना अधिकार दिले गेले आहेत त्यामुळे त्याचं समाज माध्यमातून प्रबोधन होणे गरजेचे आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता तृतीयपंथी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास उत्सुक आहेत त्याप्रमाणे समाजदेखील आहेत ,पण कुठे तरी अजून थोडासा दुरावा आहे, तो आता कमी होताना दिसत दिसत आहे ,आणि  नुकताच निवडणूक आयोगाने तो एक प्रयोग केला की समाजातल्या सर्व थरातल्या तृतीयपंथींना एकत्र करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला

त्यामध्ये एकच आक्रोश जाणवला तो म्हणजे माणूस म्हणून जगू द्या,  आमचा स्वीकार करा , Acceptance हा फार महत्त्वाचा आहे, आणि मग त्या अनुषंगाने त्यांच्या शिक्षणाचा ,स्वतंत्र घरांचा ,अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह झालेला आहे ,पण तरीदेखील कुठेतरी काही कमी आहे आणि ती कमी  येत्या काळात पूर्ण होईल   त्या बद्दल वाद नाही ,ती पहाट लवकरच येईल

Tags:    

Similar News

null