मिर्ले धनगरवाडी घटनेवर चिमुरडीने लिहील होतं पंतप्रधानांना पत्र

Ratnagiri

Update: 2022-08-06 09:52 GMT

सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. तो व्हिडीआ आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मिर्ले धनगरवाडीतला. एका आजीला डोलीत बसवून कोसो दूर खांद्यावरून दवाखाण्यात आणल जातयं. भारताच्या अमृत महोत्सवी आपला देश पदार्पण करणार आहे. तरीही अजून खेडे गावामध्ये मुलभूत गरजा पोहचल्या नाहीत. अनेक गावे स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत आहेत. ही घटणा पाहीली तर अंगावर शाहारे आल्या शीवाय राहणार नाहीत. या संदर्भात एका चिमुरडीने आपल्या गावच्या व्यथा मांडत थेट पंतप्रधानांना पत्र लिहीले होते. याच पत्राची दखल घेत त्या ठिकाणी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भेट दिली होती. त्या गावाची व्यथा जाणून घेत गावकऱ्यांशी संवाद साधला होता. परंतु यावर तूर्तास कोणतेही काम झाल नसल्याच गावकऱ्यांनी सांगीतल.

खेड तालुक्यातील मिर्ले धनगरवाडी गेली अनेक वर्षे सेवा-सुविधांची लांब राहीली आहे. दळणवळणा साठी साधा रस्ता देखील या गावात नाही. येथील लोकप्रतिनिधींकडे वारंवार उंबरठे झिजवून देखील येथील वाडी विकासापासून कोसो दूर राहिली आहे. पायाभूत सेवा-सुविधा, आरोग्यशिक्षण, दळणवळणाचा असलेला अभाव यामुळे येथील धनगरवाडीवाडीचा विकासच खुंटला गेला आहे. विद्यार्थीवर्गाला तर पावसाळ्यात रस्ताच नसल्याने शाळेत शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या वाडीतील एका विद्यार्थिनीने एका वर्षांपूर्वी थेट पंतप्रधानांना पत्र पाठवले आणि पंतप्रधान कार्यालयातून राज्याच्या ग्रामविकास विभागाला या समस्येवर लवकर तोडगा काढण्याचे पत्र दिले; मात्र अजूनही रस्ता झालाच नाही. ही खदखद आजही लोकांमध्ये असल्याचं दिसतयं आहे.

भाजपच्या नेत्या चित्राताई वाघ यांनी धनगरवाडीतील लोकांशी तिथे जाऊन संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गर्भवती मातांना दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील येथे घडल्या असल्याचे समजल्यानंतर त्यांनी दुःख व्यक्त केले. तसेच या मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. विकास का होत नाही

जिल्हा परिषद रत्नागिरीचे अध्यक्षदेखील भास्कर जाधव यांचेच पुत्र आहेत मग अशा धनगरवाड्या समस्यांच्या गर्तेत का? अनेक योजना असताना सुद्धा येथे विकास होत नाही आणि भास्कर जाधव मुंबईत जाऊन पाजळवत असतात. त्यांच्या मतदारसंघातील हा अंधार मुख्यमंत्र्यांनी आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहणे गरजेचे असल्याचे चित्राताई वाघ यांनी सांगितले. दरम्यान, या प्रसंगी त्यांच्यासमवेत येथील भाजपाचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे उपस्थित होते.

Tags:    

Similar News