भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंहच्या यांच्या विरोधात स्वरा भास्कर हिने टीका केली. हिंदू दहशतवादाच्या त्या आरोपी आहेत असे स्वरा यांनी म्हटले आहे. आपण प्रज्ञासिंहला हिंदू दहशतवादी समजता का ? असा प्रश्न ज्यावेळी स्वरा भास्कराला करण्यात आला त्यावेळी स्वरा भास्कर म्हणाली की प्रज्ञासिंह स्वत:ला हिंदू समजत असेल पण ती हिंदू दहशतवादाची आरोपी आहे. तर मी तीला हिंदू दहशवादाची आरोपी मानते असे त्या म्हणाल्या.
हिंसा, दहशतवाद पाप आहे. कुणीही हे पाप करु शकतो, हे पाप हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यापैकी कुणीही करू शकतो. असे पाप अनेकांनी केले आहेत. पण दहशतवादाला धर्म नसतो. पण दहशतवाद्याचा धर्म असतो असे स्वराने नमूद केले.प्रज्ञासिंह यांच्याकडे राजकारण आणि गुन्हेगारी अशा दोन्ही बाजू आहेत. जे रुप घेऊन प्रज्ञासिंह राजकारणात दाखल झाल्या आहेत. ते खरच धोकादायक आहे!.