सोलो वरवधू राजी तर ,पंडितांची का नाराजी ? | Kshama Bindu Sologamy Marriage

Update: 2022-06-13 03:16 GMT

गुजरातच्या २४ वर्षीय तरुणीने स्वतःशीच विवाह केला .या विवाहाला पंडितांनी मात्र उपस्थित राहण्यास नकार दिला .क्षमा बिंदू असं या २४ वर्षीय तरुणीचं नाव असून ती एका खाजगी कंपनीत नोकरी करते. स्वतःवर असलेल्या प्रेमामुळे तिने स्वतःशीच लग्न केलं आहे असं ती म्हणते. तिला लग्न करायचं नव्हतं पण तिला नवरी बनायचं होत ,म्हणून दुसऱ्या कोणाची पत्नी न बनता तिने स्वतःशीच लग्न केलं .यालाच सोलोगामी म्हणतात. नक्की सोलोगामी म्हणजे आहे तरी काय ?क्षमाचा विवाह लावण्यास पंडितांनी का नकार दिला? या प्रकारची लग्न इतर ठिकाणी होतात का? असं लग्न करून कोणी घटस्फोट घेतला का?सोलोगामी हे फॅड आहे कि आगामी ट्रेंड?अशा अनेक प्रश्नाची उत्तरे जाणण्यासाठी वाचा हा रिपोर्ट...


सोलोगामी म्हणजे काय

सोलोगामी म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःशी लग्न करते.स्वतःवर असणार प्रेम आणि इतर कुणाच्या प्रेमाच्या अपेक्षेत न राहता स्वतःमध्ये खुश राहण्याच्या विचारामुळे सोलोगामीचा निर्णय घेतला जातो. 1993 मध्ये लिंडा बेकर, लॉस एंजेलिसमधील दंत आरोग्यतज्ज्ञ, यांनी स्वतःशी लग्न केले.हा ट्रेंड सुरू करणारी पहिली व्यक्ती म्हणून लिंडा यांना मानले जाते. लिंडा बेकरच्या लग्नाला 75 मित्रांनी हजेरी लावली होती.स्वतःशी लग्न करण्याबाबत लिंडा बार्कर म्हणाली, 'हे स्वतःसाठी काहीतरी करण्यासारखे आहे. स्वतःला आनंदी करण्यासाठी कोणाचीही वाट पाहू नये हा त्याचा संदेश आहे. हा ट्रेंड नुकताच क्षमाच्या स्व-विवाहाने भारतात पोहोचला आहे.

सोलोगॅमी म्हणजे अशी व्यक्ती जी लग्न करून आपले उर्वरित आयुष्य स्वतःसोबत घालवणार आहे. त्याचं उदाहरण टीव्ही मालिका 'सेक्स अँड द सिटी'मध्ये पाहायला मिळतं जिथे कॅरी ब्रॅडशॉने स्वतःशी लग्न केले आहे.सोलोगामीचा उद्देश स्व-प्रेमाला दुसर्‍या स्तरावर घेऊन जाणे होय . एकल विवाहाचे समर्थक म्हणतात स्वतःशी लग्न करणं हे मुक्त आहे . १०० हुन अधिक महिलांनी आजवर जगभरात स्वतः स्वतःशी लग्न केलं आहे . बाबच




 क्षमाचा विवाह लावण्यास पंडितांनी का नकार दिला ?

क्षमाचा विवाह लावण्यास पंडितांनी नकार दिला कारण स्वतःशीच विवाह करणं हिंदू धर्मात न बसणार आहे. तिच्या लग्न स्थळावरूनही विरोध दर्शवला गेला होता . त्यामुळे तिने घरात लग्न करण्याचा निर्णय घेतला तरीही पंडितांनी क्षमा बिंदूच्या लग्नाचे विधी करण्यासही नकार दिला . यावर क्षमाने टेपवर मंत्र वाजवून लग्न करण्याचा निर्णय घेतला होता . ११ जूनला तिने लग्न करण्याची घोषणा केली होती मात्र अशा वादांमुळे तिने लग्न ३ दिवस आधीच केलं . तिला तीच लग्न शांततेत पार पडायचं होत,असं ती म्हणते.

या प्रकारची लग्न इतर ठिकाणी होतात का?

१९९३ मद्ये लिंडा बेकर यांनी सोलोगामीचा ट्रेंड अस्तित्वात आणला .त्यांनतर इतर देशातही १०० हुन अधिक स्त्रियांनी सोलोगामी या संकल्पनेनुसार लग्न केलं आहे. भारतात मात्र क्षमा बिंदू हे पहिल उदाहरण आहे.

असं लग्न करून कोणी घटस्फोट घेतला का?

क्रिस गॅलेरा हि ब्राझीलची ३३ वर्षाची युवती जिने सप्टेंबरमद्ये स्वतःशी लग्न केलं होत . पण अवघ्या तीन महिन्यानंतर तिला सोबती मिळाला .त्यामुळे तिने स्वतःशीच घटस्फोटही घेतला .हि युवती इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहे .पण तीन महिन्याचे वैवाहिक जीवन सुद्धा चांगलंच होत असं ती म्हणते .

सोलोगामी हे फॅड आहे कि आगामी ट्रेंड?

प्रिया राजेंद्रन,ब्लॉगर म्हणतात की सोलोगामी एक फॅड सारखी दिसते परंतु फॅडमुळे ती एक संकल्पना बनू शकते.त्या म्हणतात कि प्रत्येकाला त्यांचे स्वतःचे विचार आहेतच पण हे निरर्थक खर्च आणि दुटप्पीपणासारखे वाटते कारण एकीकडे, तुम्ही परंपरांच्या विरोधात आहात असा दावा करता पण तेच विधी देखील करायचे आहेत.हा एक प्रकारचा ढोंगीपणा आहे . आणि अगदी सोशल मीडिया पब्लिसिटी स्टंट!


दरम्यान, क्षमाने एका व्हिडिओ संदेशात तिच्या सर्व चाहत्यांचे आणि फॉलोअर्सच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. "माझं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे. माझी बाजू घेत असलेल्या सर्व ट्रोलांमुळे तुम्ही माझ्यावर एवढी दयाळूपणे वागलात हे मी शब्दात वर्णन करू शकत नाही. तुमचे संदेश आणि कथा वाचून मला आनंदाश्रू आले आणि मी माझ्या लग्नाच्या दिवसासाठी खूप उत्साहित आहे, " ती म्हणाली.

सध्या स्वतःवर प्रेम करण्याचे अनेक ट्रेंड येताना दिसत आहेत. पण सोलोगमीसारखा विषय लोक आता आवडीने चर्चेला घेताना दिसत आहेत . कोणी याच्याबद्दल वाईट बोलत आहे तर कोणी या गोष्टीच समर्थन सुद्धा करताना दिसत आहे. पण यामुळे पुढे जाऊन विवाह संस्थेच्या व्याख्या बदलतील का ? असा प्रश्न आणि त्यावरचे अंदाज काळानुसार बांधले जातील .

Tags:    

Similar News