भारतीय सण आणि निसर्ग यांचे नाते अधिक दृढ करत महिलांनी संक्रांतीनिमित्त होणाऱ्या हळदीकुंकू समारंभात दिसत असतात. सध्या मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी महिलावर्गाचे हळदीकुंकू समारंभ साजरे होतात. या समारंभात वाण म्हणून निरनिराळ्या गृहोपयोगी भेटवस्तू महिलांना दिल्या जातात. दौंड येथे "आई "सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हळदीकुंकू समारंभनिमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.शुभांगी धायगुडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचा मुख्य उद्देश विधवा महिलांना हळदी कुंकू समारंभात आमंञित करून सन्मान द्यावा, हा विचार या निमित्ताने समाजापुढे यावा व तो समाजाला व स्ञीसन्मानाला दिशा देणारा ठरावा म्हणून हळदीकुंकू समारंभ ठेवण्यात आला.