अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आलं असून आगामी तीन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस नेतृत्वावर थेट टीका करणे भाजपला आता अवघड जाणार आहे. आता पुढील महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा या राज्यांमध्ये सोनियांच्या नेतृत्वाचा फायदा होईल, असा विश्वास पक्षनेत्यांना वाटू लागला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी काँग्रेसविरुद्ध आक्रमक प्रचार केला होता.याचा फायदा त्यांना लोकसभेत झालं देखील. त्यामुळे सोनिया गांधींमुळे काँग्रेसला लढण्यासाठी बळ मिळाल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला आहे. त्याचबरोबर सोनियांच्या निवडीमुळे पक्षात शिस्त येईल, अशी आशा पक्षनेत्यांना आहे.