वारकऱ्यांच्या सेवा करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्न करत असतो. यात महिलाच प्रमाण अत्यल्प आहे. मात्र याला अपवाद आहेत त्या सुनंदा पवार... मागील दहा पंधरा वर्षांपासून सुनंदा पवार पालखीमार्गातील वारकऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतात. वारीत वृद्धांचा सहभाग जास्त असतो. वारकरी वारी करताना तहान भूक विसरून मार्गक्रमण करत असतात. त्यावेळी ते स्वतःची काळजीसुद्धा घेत नाही. अशा वारकऱ्यांच्या तब्येतीची काळजी सुनंदाबाई घेताना दिसतात.
रोहित पवार यांनी स्वतः फेसबुकवर अशा प्रकारची पोस्ट शेअर केली असून
"पालखीचे प्रस्थान होईपर्यन्त देहूमध्ये वारकऱ्यांच्या सोबत आनंदसोहळ्यात कालचा दिवस घालवता आला हे मी भाग्यच समजचो"
असं या पोस्ट मध्ये लिहलं आहे.