संगीतप्रेमींसाठी "फ्लेव्हर्स ऑफ यमन" अल्बम ठरतोय पर्वणी

Update: 2019-06-08 12:31 GMT

संगीत हे प्रत्येक व्यक्तीच्या जवळची गोष्ट आहे. फार कमी प्रमाणात शास्त्रीय संगीत ऐकायला येतंय. अशामध्ये गायक खूप आहेत. मात्र, सूर कुठेही ऐकू येत नाही. याच पार्श्वभूमीवर "द सोप्रनोज स्कूल ऑफ़ म्यूज़िक" च्या वतीने शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार अधिकाधिक प्रमाणात व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहे. नवीन पिढीला अभिजात संगीताची गोडी निर्माण व्हावी, त्याचबरोबर रसिकांपर्यंत हे संगीत पोहचवणं हा उद्देश या अकादमीचा आहे.

यासाठी द सोप्रनोज स्कूल ऑफ़ म्यूज़िक च्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन "फ्लेव्हर्स ऑफ यमन" या अनोख्या अल्बमचं लॉन्च मागील ३१ मे ला करण्यात आलं. यावेळी माधव बाग चे सीईओ व फाऊंडर डॉ. रोहित सानेंची उपस्थिती लक्षणीय ठरून त्यांच्या शुभ हस्ते अल्बम लॉन्च करण्यात आला. नवीन पिढीला शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण व्हावी या हेतूने या अकादमीनं एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. "फ्लेव्हर्स ऑफ यमन" अल्बमला भारतात त्याचबरोबर भारताबाहेरुनही खुप भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या शास्त्रीय संगीताची धून ऐकण्यासाठी आवर्जून हा व्हिडीओ पाहा.

https://youtu.be/Ov6ASOc-Q0Q

 

 

Similar News