तिवसा विधानसभा मतदारसंघात नव्हे तर जिल्ह्यात काही ठिकाणी वन विभागाची असलेली हद्द ही अडचण ठरली आहे. या अडचणी मुळे मुख्य रस्त्याचे व पूल निर्मिती चें काम रखडले असून यामध्ये अमरावती पांडुर्णा रस्त्याचे समावेश आहे ही बाब लक्षात घेऊन वन विभागाकडून निर्माण झालेली ही तांत्रिक अडचण दूर करण्यात यावी अशी मागणी आमदार अँड यशोमती ठाकूर यांनी आज २७ जून रोजी विधानसभेत केली.
राष्ट्रीय किंवा राज्य मार्ग यांनी निर्मिती करताना ज्या विभागाच्या हद्दीत हा रस्ता येत असेल तर त्या विभागाकडून तशी परवानगी मिळाली तरच रस्त्याचे हे काम पूर्ण होते हा मुद्दा सभागृहात मांडताना आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की अमरावती पांढुर्णा या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे ,मात्र रस्त्याचा काही भाग हा वन विभागाच्या हद्दीत येत असल्यामुळे रस्त्याचे काही काम व पूल निर्मिती होऊ शकली नाही परिणामी वाहतुकीची समस्या आज ही जैसे तेच आहे.
सर्वसामान्य नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असून रखडलेल्या रस्त्याचे कामामुळे अपघाताचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे या सर्व बाबीचा विचार करून वन विभाग मूळे रस्ता निर्मिती ची झालेली कोंडी सोडविण्यासाठी सरकारने वन विभागांची ही अडचण दूर करण्यासाठी तात्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार अँड यशोमती ताई ठाकूर यांनी सभागृहात रेटून धरली.
https://youtu.be/MRT6Rrcec6A