अमेरिकेत संशोधक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. ऋतुजा चित्रा तारक यांना इकॉलॉजीतील यावर्षीचा आंतरराष्ट्रीय जॉन हॉर्पर पुरस्कार मिळाला आहे. २०१८चा हा पुरस्कार पटकावणाऱ्या डॉ. ऋतुजा या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत.हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. वृक्षतोड किंवा वृक्ष हानी झाल्यास पुढे भविष्यात दुष्काळजन्य स्थिती अधिकच गंभीर होण्याचा धोका डॉ. ऋतुजा यांनी संशोधनातून व्यक्त केला आहे.
कमी पावसात जंगलातील झाडे कमी पाण्यावर कसे जगतात, हा त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय होता. दूरवर पसरलेली मुळे व पाण्याचे स्रोत यातील परस्पर संबंधाचाअभ्यास हा याविषयाचा आधार होता. जागतिक हवामान बदलाचा सजीवांवर होणाऱ्या परिणामांवर जगभर संशोधन सुरू आहे. डॉ. ऋतुजा यांनी सात वर्षे उष्णकटिबंधीय शुष्क जंगलातील वनसृष्टीवर दुष्काळीस्थितीत काय परिणाम होईल, याचा सखोल अभ्यास केला आणि त्यातून हा निष्कर्ष काढला.
. डॉ ऋतुजा यांनी १९९२ ते २०१२ या काळात पडलेला पाऊस, भूगर्भातील जलपातळी या पाश्र्वभूमीवर दर उन्हाळय़ात जमिनीच्या वेगवेगळय़ा खोलीवर पाण्याची उपलब्धता तपासली होती.अमेरिकेतील शीतकटिबंधीय वृक्षांनांही हेच निष्कर्ष लागू होतात का, याविषयी अभ्यास करीत आहेत. जगात दुष्काळी परिस्थितीत खोलवर मुळे असणाऱ्या वृक्षांची संख्या मोठय़ा प्रमाणात होत असल्याने त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच प्रत्येक दुष्काळात वृक्षांचे किती प्रमाणात हानी होऊ शकते, हे तपासण्यासाठी डॉ ऋतुजाचे संशोधन मोलाचे ठरणार आहे.