मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी मदत केली जाते . मात्र (माझ्या मतदार संघातील ) ? तब्बल ५ हजार अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात पडून असल्याचे दिपीका चव्हाण यांनी निदर्शनास आणले. मात्र याची दखल मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष घेत नसल्याची खंत त्यांनी आज सभागृहात व्यक्त केली.मुख्यमंत्री सहाय्यता निधी उपल्बध नसल्याची उत्तर दिली जात त्यांना दिले गेले आहे तरी मुख्यमंत्र्यांनी गरजू गरीब महिलांना तात्काळ या निधी अंतर्गत मदत करावी असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अामदार दिपीका चव्हाण यांनी म्हटलं आहे. याला सभापती हरिभाऊ बागडे यांनी उत्तर देत सांगितलं की २००९ते २०१४ च्या काळात ५ हजार कोटी मदत करण्यात आली तर १४ पासून आतापर्यंत साडेपाच हजार कोटी दिले गेले आहे.