मुक्ता बर्वेचा प्रवास

Update: 2019-06-21 12:05 GMT

आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे पाहिलं जातं . मुक्ता बर्वेचा जन्म पुण्याजवळील चिंचवड गावात १७ मे १९८१ झालं. वडील वसंत बर्वे आणि आई विजया बर्वे शिक्षिका व नाट्यलेखिका असल्याने बालपणापासूनच रंगभूमीची आवड निर्माण झाली. तिने अनेक गाजलेल्या नाटक, मालिका आणि चित्रपटातून आपल्या सशक्त अभिनयाचे दर्शन घडवले आहे. २००८ साली "दे धक्का" आणि "सास बहू और सेन्सेक्स" या हिंदी चित्रपटातून मुक्ताने छोट्या भूमिका साकारल्या. पुढे २०१० साली प्रदर्शित झालेल्या सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटाने पुन्हा एकदा मुक्ताला घवघवीत यश मिळवून दिले. एका लग्नाची दुसरी गोष्ट , सावर रे , ऐका दाजीबा,बदाम राणी गुलाम चोर, लग्न पहावे करून, ‘डबलसीट’, हृदयांतर , मुंबई पुणे मुंबई ३, आम्ही दोघी असे अनेक चित्रपट तिने केले.

Similar News