महिला सुरक्षित नाही स्मृति इरानी ने मोदी आणि योगी सरकारला आता बांगड्या भराव्या : कल्याणी रांगोळे
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील 4 जून 2017 रोजी उन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर आणि त्याच्या भावाने बलात्कार केला, इतकेच नाही तर भाजप आमदाराने पीडित मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. 28 जुलै 2019 रोजी पीडित मुलगी नातेवाईकांसह कार मधून जात असताना तिच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली यामध्ये पीडित मुलीची काकी आणि मावशीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पीडित मुलगी गंभीर जखमी झाली.
बलात्कारी भाजप आमदारावर कारवाई न करता योगी आदित्यनाथ यांचे भाजप सरकार सेंगर यांना पाठीशी घालत असल्याने देशभर भाजप सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पीडितेला ठार मारण्याचा कट करणाऱ्या भाजपा आमदार कुलदीपसिंह सेंगर यालाच आता भाजपा सरकार ने बेटी बचाओ बेटी पाढाओ या मोहिमेचा दूत नेमा, अशी मागणी करत आज नाशिक जिल्हा युवक काँग्रेस चे वतीने नाशिक मधे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, युवक प्रदेश सचिव कल्याणी रांगोळे ह्यांच्या नेतृत्वा खाली निदर्शने करण्यात आली.
महिला सुरक्षेबद्दल खोटा कळवळा दाखवून आपल्याच नेत्यांकडून महिलांवर होणारा अत्याचार मूग गिळून गप्प बघत बसणाऱ्या भाजपा सरकारचा या युवती कॉंग्रेस कडून बांगड्या भेट पोस्ट करुण निषेध करण्यात आला. यावेळी 'पहले bjp से बेटी बचाओ फिर बेटी पाढाओ'
आशा मेसेजचे फलक झळकावले गेले. आणि उत्तर प्रदेशचे *मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रतिकात्मक पुतळ्याना बांगड्या घालून पुतळे जाळले गेले.
https://youtu.be/VcXhrt0sWNM