महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या भूमिकेत ही अभिनेत्री ?

Update: 2019-07-03 10:23 GMT

बॉलीवूडमध्ये याआधी अनेक बायोपिक आले. यामध्ये महेंद्रसिंह धोनी, सायना नेहवाल, कपिल देव, खली यांसारख्या बायोपिकला प्रेक्षांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता आणखी एका खेळाडुचा जीवन प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटात मिताली राजची भूमिका कोण करणार याची देखील चर्चा सुरु आहे.

दरम्यान मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानूसार अभिनेत्री तापसी पन्नूची निवड करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. तरी अजूनही अधिकृत घोषण झालेली नसून चित्रपटाची कथा लिहिण्याचे काम सुरु आहे . दरम्यान यापूर्वी या भूमिकेबद्दल तापसीला विचारले असता ती आनंदाने ही ऑफर स्वीकारेल असा खुलासा तिने केला होता. दिलजीत दोसांज यांच्या ‘सूरमा’ या चित्रपटात हॉकी प्लेअरची भूमिका तिने याआधी साकारली होती.

 

 

Similar News