महिला उद्योजिकांना आता 'डिक्की'ची साथ

Update: 2019-07-05 12:23 GMT

मुंबई : मुंबईतील महिला उद्योजिकांना उद्योगाच्या नवनवीन संधी मिळाव्यात, त्यांच्या उद्योगाची भरभराट व्हावी यासाठी दलित इंडियन चेंबर्स ऑफ काॅमर्स ॲण्ड इंडस्ट्री अर्थात 'डिक्की'च्या महिला विभागाने एका मार्गदर्शन परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद शनिवार, ६ जुलै २०१९ रोजी सायं. ४ ते ७ या वेळेत दादर, छबिलदास शाळा येथे होणार आहे.

व्यवसायाची निवड व व्याप्ती, व्यवसायातील समस्या, सरकारी योजना, आर्थिक पाठबळ, एकमेकांप्रति साह्य करून साधावयाचा उत्कर्ष आदी विषयाच्या अनुषंगाने या परिषदेत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. व्यवसाय करणारी वा करण्याची इच्छा असणारी महिला या परिषदेस उपस्थित राहू शकते. तरी महिलांनी या परिषदेस अधिक संख्येने उपस्थित राहून परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन' डिक्की'च्या महिला विभागाने केले आहे

Similar News