छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त टिप्पणी करणारी बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगीनं पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंड फोडलंय. भारताचा उल्लेख ‘मुल्क’ असा केल्यानं पायलनं ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींवर जोरदार टीका केलीय. शबाना आझमी यांनी एका भाषणादरम्यान भारताचा उल्लेख मुल्क असा केला असल्याचं पायलचं म्हणणं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर तिनं एक व्हिडीओही प्रसारित केलाय.
‘‘मुल्क हा उर्दू शब्द आहे आणि भारत हा हिंदू विचारांचा देश आहे. आपल्या नेत्यांनी मुस्लीमांसाठी आधीच दोन देशांची निर्मिती करुन दिली आहे. आता भारतात मुस्लीम राहत असले तरी हा ‘इस्लामिक मुल्क’ नाहीय’’ असं पायलनं म्हटलंय. शबाना यांना चांगल्या भूमिका मिळत नाहीयत, त्यामुळं राजकारणात येण्यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याचा टोला पायलनं लगावलाय.
https://youtu.be/-DIUUJ7hETo