प्रियंका रेड्डी बलात्कार व हत्याकांड प्रकरणात सगळीकडे आक्रोश सुरु आहे. महिलां बरोबरच पुरुष वर्गही अस्वस्थ आहे. कामावर जाणा-या महिला मुलीं या भारतात सुरक्षीत आहे का? अजुन किती वेळा मेणबत्या घ्यायच्या ? मुली भारतात जन्मालाच येवु नये का? असे प्रश्न महिला वर्गाकडुन उपस्थित केले जात आहेत. महिलांचा राग,निराश अश्या संमिश्र भावना आपल्याला बघायला मिळत आहेत. यापासुन पत्रकार वर्गही दुर राहु शकत नाही. प्रसारमाध्यमातील रुबिका लियाक्युटा या महिला पत्रकाराला आपले अश्रुच अनावर झाले याबद्दल बोलतांना त्या म्हणाल्या की अजुन कितीवेळा याच विषयांवर चर्चा होणार , निर्भयानंतर हे थांबेल अस वाटलं होत मात्र ते सत्र अजुनही सुरुच आहे. अश्या बातम्या तटस्थ पध्दतीने देणे आता कठिण असल्याच त्या स्वतः सांगत आपल्या अश्रुना त्यांना वाट मोकळी केली.
https://www.facebook.com/abpnews/videos/980065072357471/?t=4