डॉक्टर पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता लोखंडवाला यांच्या जामीन अर्जावरील निर्णय सत्र न्यायालयाने २४ जूनपर्यंत राखून ठेवला आहे. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास पुढे सरकत नसल्याने, सत्र न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या या तिन्ही डॉक्टरांना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर लगेचच न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर, या तिन्ही आरोपींनी याविरोधात सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.
या तिघींनी त्यांच्याविरोधातील पुरावे नष्ट केले आणि त्या तपासास सहकार्य करत नाही, तसेच आरोपी डॉक्टर असल्या, तरी पीडिताही डॉक्टर होती, याचा विचार करावा, असे सरकारी वकिलांनी म्हटले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने या तिघींच्याही जामिनावरील निर्णय २४ जूनपर्यंत राखून ठेवला.