अमरावती : निराधार श्रावण बाळ योजनेतील लोकांना दर महिना दोनशे रुपये न देता 2 हजार रुपये द्या, अशी मागणी नवनीत राणा यांनी लोकसभेत केली आहे. देशातील निराधारांना श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत केवळ 200 रुपये महिना केंद्र सरकारकडून देण्यात येतो मात्र वाढती महागाई लक्षात घेता केंद्र सरकारतर्फे किमान 2 हजार रुपयांचा मदत मिळावी अशी मागणी मरावतीच्या खासदार राणा नवनीत कौर यांनी केली आहे.
त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही गरीबांसाठी घरकुल योजनेचा लाभ मिळायला हवा असून घरकुल योजनेत वाढ व्हावी महाराष्ट्राला घरकुल योजनेअंतर्गत २२ ते २५ लाख घरे बांधता यावी त्यासाठी ७ लाखावरुन मर्यादा २५ लाखा प्रयन्त वाढवावी ही मागणी खासदार नवनीत कौर यांनी केली.
VIDEO : नवनीत कौर यांचं संपूर्ण भाषण