थेरेसा मे यांचा राजीनामा जाहीर

Update: 2019-05-25 12:10 GMT

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या कंझरव्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या आहेत. थेरेसा मे या 7 जून रोजी आपला राजीनामा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तर हा निर्णय त्यांनी ब्रेक्झिटला पूर्ण करण्यात अपयश व लोकप्रतिनिधीचा पाठिंबा मिळवण्यात यश न आल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा ठरवलं .ब्रेक्झिट करारावर ब्रिटिश संसदेची मंजुरी मिळवण्यात त्या तीनदा अपयशी ठरल्या. दरम्यान राजीनामा देण्याच्या ठरावावर बोलत असताना "मी या देशाची दुसरी महिला पंतप्रधान होते, पण शेवटची नक्कीच नाही. देशाचं पंतप्रधानपद भूषवणं माझ्यासाठी अत्यंत गर्वाची गोष्ट आहे," असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. ब्रेक्झिट करार पूर्ण करू शकलो नाही याची खंत शेवटपर्यंत राहील अश्या त्या म्हटल्या. त्या ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. डेव्हिड कॅमरुन यांनी जुलै २०१६ ला राजीनामा दिल्यानंतर थेरेसा मे यांनी पंतप्रधानाची दुरा सांभाळली.

Similar News