त्यांच्या वस्तीगृहाचं काय ?

Update: 2019-06-26 07:46 GMT

बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड येथील आदिवासी मुला-मुलींच्या नवीन वसतिगृहाला 19 सप्टेंबर 2018 रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली मात्र अद्यापही वसतिगृहाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आलेली नाही यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याचा प्रश्न आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला . यावर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिलेल्या उत्तरानुसार अद्यापही बांधकाम झाले नाही हे खरं असून कोलवड येथील आदिवासी शासकीय मुलींचे व मुलांचे दोन्ही वसतिगृहाच्या बांधकाम करावयाच्या जागेवर मातीची भारवाहक क्षमता चाचणी करण्यात आली असून पुढील प्रक्रिया सुरू करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून कार्यवाही सुरू आहे .

तसेच सद्यस्थितीत आदिवासी शासकीय मुला-मुलींचे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत कार्यरत असून कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आलेलं नाही असं डॉ अशोक उईके यांनी सांगितले. मात्र असं जरी असलं तरीही गेल्या वर्षभरापासून मान्यता प्राप्त होऊनही या कामास सरकार कडून विलंब झाल्यामुळे आदिवासी मुला मुलींच्या शिक्षणाची काळजी या सरकारला आहे की नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय.

 

Similar News