डॉ. हिना गावित यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाचं कौतुक नरेंद्र मोदींनी देखील केला. नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित या आदिवासी समाजाचे प्रश्न त्याचबरोबर आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याबाबतही हिना गावित यांनी भाष्य केलं. या निवडणुकीचं वैशिष्ट म्हणजे जास्त महिला मतदारांनी सहभाग घेतला असून महिला मतदारांनी मोदींना निवडून आणल्याचं डॉ. हिना गावित म्हटल्या. नंदुरबारच्या आदीवाशी गावा संदर्भात बोलताना त्या म्हटल्या की दवाखाने , रस्ते , शाळा यांची कमतरता असल्यामुळे तेथील रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी पारंपरिक दोन बांबूच्या साह्याने नेण्यात येत असत मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये येथील परिस्थिती सुधारली असून दवाखाने , रस्ते , शाळा यांची सुरवात झाली आहे.
देशांतर्गत होत असलेल्या विकासाच्या कामांमुळेच मी भाजपमध्ये गेले व येथील सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्याचबरोबर लोकसभेत मिळालेल्या प्रचंड बहुमताचा खुलासा देताना मोदी सरकारला का मतं मिळाली यावर भाष्य करून मोदी सरकारचं अभिनंदन केलं. दरम्यान या भाषणाचं कौतुक नरेंद्र मोदींनी देखील केलं.
VIDEO :हिना गावित यांचं संपूर्ण भाषण