डाॅं गितांजली यांनी मदतीसाठी केले असे आवाहन

Update: 2019-08-09 09:17 GMT

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पाचव्या दिवशीही महापुराचा धोका कायम आहे. पुराचे पाणी वेगानं वाढत असताना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणांपासून, सामन्य नागरिकही मदतीला धावून आले. यामध्ये डॉ. गीतांजली घोलप यांनी मदतीचे हात पुढे करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून मदत कार्य सुरु केले आहे. पुरामध्ये अडकलेल्या हजारो नागरिकांसाठी ही मदत दिली जाईल असं आवाहन त्यांनी या माध्यमातून केले आहे.

नागरिकांसाठी अन्न, वस्त्र, मात्र सॅनिटरी पॅड वापरण्यासाठी जी अंत:वस्त्र लागतात ती मदत जर आपण सगळ्यांनी मिळून केली तर? मैत्रिणींनो आपल्या सगळ्यांना माहितेय या दिवसांत किती स्वच्छता पाळावी लागते. परंतु या पूरपरिस्थिती मध्ये हे शक्य नाही. मला वाटत आपण सगळ्यांनी मिळून प्रत्येकी एक याप्रमाणे किमान एक नवीन अंत:वस्त्र मदत म्हणून दिलेत तर? आपण जर या प्रकारची मदत करण्यास इच्छुक असाल ही मदत ही करता येईल असे आवाहन त्यांनी केले आहे यात ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सर्पक करावा 9594063760

दरम्यान सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात आजही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Similar News