ट्यूमरग्रस्त मुलीला प्रियंका गांधींची मदत

Update: 2019-05-11 06:39 GMT

एकीकडे निवडणुकीत सर्वच पक्ष आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्यात अडकलेले असताना काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीचं माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा घडलं प्रयागराज येथून प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी एका लहान मुलीला उपचारासाठी स्वतःच्या खासगी विमानाने दिल्लीतील एम्स हॉस्पिटला पाठवलं.

दरम्यान प्रयागराज येथे कमला नेहरू रुग्णालयात एक मुलगी ट्यूमर आजारामुळे उपचारासाठी दाखल झाली होती . प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे मुलीची प्रकृती गंभीर असल्या कारणाने कुटुंबीयांनी प्रियंका गांधी यांच्याकडे मदत मागितली असता प्रियंका गांधी यांनी तातडीने मुलीच्या मदतीसाठी पाऊलं उचलली.

Similar News