उशीरा हा होईना राज्याच्या बहुतांश भागात मान्सून दाखल झाल्यानं शेतकरी पेरणीच्या तयारीला लागलेत. ज्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झालाय तिथं पेरणीची लगबग सुरू आहे. अमरावती जिल्ह्यामध्येही शेतकरी पेरणी करतोय. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला.
नवनीत राणा थेट शेतात पोहचल्य़ा आणि सोयाबीनच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत केली. कमरेला पदर खोवून नवनीत यांनी स्वतः नांगर चालवला. आ. रवी राणा यांनीही नवनीत राणांना मदत केली. नवनीत राणा आणि रवी राणा शेतात आल्याचं कळताच लोकांनी त्यांना बघायला गर्दी केली.लोकांच्या दुखा:त आणि सुखात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. चांगला पाऊस पडावा अन् बळीराजा सुखी व्हावा, असं साकडं नवनीत राणांनी विठ्ठलालाला घातलं.
खासदार असूनसुद्धा शेतात जाऊन पेरणी केल्यानं अमरावतीमध्ये सध्या शेतकरी खासदारताईंचीच चर्चा आहे. त्यांच्या या साधेपणाचं कौतुक होतंय.लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांबाबत गंभीर होऊन त्यांनी सभागृहात आवाज उठवला. आता संसदेचं अधिवेशन संपवून मतदारसंघात येताच त्यांनी लोकांमध्ये जात आपल्या कामाला सुरुवात केलीय.
https://youtu.be/xX6EXf4Qu8c