जळगाव – येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर राज्यस्तरीय आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. जळगाव फुटबॉल असोसीएशन आयोजित राज्यस्तरीय आंतर जिल्हा महिला खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धेला २० जूनपासून शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरवात झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील २४ जिल्हा संघाचा सहभाग आहे. एकूण चार गटात या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. यामध्ये जळगाव महिला संघाचा सुद्धा सहभाग आहे.जळगाव जिल्ह्याचा ब गटात समावेश आहे.
जळगाव जिल्ह्याचा पहिला सामना ठाण्यासोबत होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महापौर सीमा भोळे,उपाध्यक्षा प्रा.डॉ.अस्मिता पाटील,सचिव फारुख शेख,आयशा मोहम्मद,अंजली पाटील,कांचन चौधरी,महावीर क्लासेसचे नंदलाल गादिया,स्पोर्ट हाऊसचे आमीर शेख आदी उपस्थित होते.