जव्हार- नवऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर वृक्षला हिने स्वत:चा आणि दोन लहान मुलींचा सांभाळ कसा करायाचा या विवंचनेतुन ३ वर्षीय मुलगी दिपाली आणि ७ महिन्यांची वृषाली हिला विष पाजून आपली जीवन यात्रा संपवली मात्र चिमुकली वृषाली वाचली ही मन हेलावुन टाकणा-या घटनेने जव्हार तालुका सुन्न झाला आहे.
याबाबत लक्ष्मी अमृत टोकरे ( मृत वृक्षालीची आई) हिने दिलेल्या फिर्यादी वरुन ५ जुन रोजी वृक्षला वय ३० हिने दोन्ही मुलीना विष पाजून मग ती स्वतःही प्यायली. यामध्ये मोठी मुलगी दिपाली आणि वृषाली हिचा मृत्यू झाला तर काही महिन्यांची चिमूकली मात्र बचावली असली तरी ती जव्हार कुटीर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. मुळात जुन मध्ये कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्यानंतर जगायचे कसे हाताला रोजगार नाही मुलीना जगवायचे कसे या प्रश्नातून या सर्व कुटुंबानेच आत्महत्या केल्याने तशी नोंद जव्हार पोलिसांत करण्यात आली आहे.
मुळात रोजगात हमी घरकुल योजना रेशनवर धान्य विधवाना पगार अशा अनेक योजना आदिवासींसाठी शासन राबवित आहे. मात्र या योजना किती पोकळ आहेत त्या कागदावरच कशा राहतात हे या घटनेवरुन समोर आले आहे
अत्यंत गरिब प्रतिकूल परिस्थिती हे कुटुंब जीवन जीवनाचा गाडा चालवत होते. मात्र या गरिब व दारिद्याला कंटाळून नव-याने आत्महत्या केल्याने पत्नीने कुटुंब संपण्याचा निर्णय घेतला. नव-याचे निधन झाल्यानंतर वृक्षलाकडे उदर निर्वाहाचे कोणतेही साधन नव्हते. मुलींना रोज दोन घास मी कुठून आणू या विवंचनेत ती असल्याचे शेजारच्यांनी सांगितले.