कॅन्सरग्रस्त ऋषि कपूर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असून त्यांना भेटण्यासाठी बच्चन फॅमिली देखील गेली आहे. या उपचारासाठी ते न्यूयॉर्क मध्ये राहत आहेत. एक्टर ऋषि कपूर यांना न्यूयॉर्क मध्ये उपचार घेऊन ८ महिन्याच्या वरती कालावधी झाला आहे. नीतू कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे फोटो शेयर केले आहेत, त्याचबरोबर रणबीर कपूर च्या फैनपेजवरती शेयर केलेल्या फोटोमध्ये ऋषि कपूर यांच्याबरोबर आलिया भट्ट, नीतू कपूर और ऋद्धिमा दिसत आहेत, दुसऱ्या फोटोमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन बरोबर त्यांची मुलगी अराध्या दिसत आहे.
उपचारा दरम्यान ऋषि कपूर यांना भेटण्यासाठी बॉलीवुड मधील अनेक कलाकार येत असून आता मात्र बच्चन आणि कपूर परिवार एकत्र दिसत आहे.