ऑनर किलिंगच्या भीतीने मुलीची लग्नाआधीच पालकांविरोधात न्यायालयात धाव

Update: 2019-05-07 06:59 GMT

अहमदनगर जिल्ह्यामध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या नातेवाईकांनी नवरा आणि मुलीला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर अनेक नव तरुणांमध्ये भितीचं वातावरण आहे. त्यामूळे स्व:ताचा जीव वाचवण्यासाठी मुलीने लग्नाआधीच पालकांविऱोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून आपला व आपल्या होणाऱ्या पतीचा जीव वाचवला जावा अशी मागणी केली आहे.

काय म्हटलंय याचिकेत ?

आंतरजातीय प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या पालकांकडून जीवाला धोका आहे. असं या मुलीचं म्हणणं आहे. आंतरजातीय प्रेमाला होणाऱ्या विरोधातून हिंसाचाराच्या घटना महाराष्ट्रासाठी नवीन नाहीत. हे आपल्या बाबतीत घडू नये. म्हणून पुणे जिल्ह्यातल्या एका तरूणीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून आपला व आपल्या होणाऱ्या पतीचा जीव वाचवला जावा म्हणून आपल्याला पूर्णवेळ पोलीस संरक्षण मिळावं, अशी मागणी मुलीने केली आहे.

Similar News