"Article 15 of the Indian Constitution prohibits discrimination of Indians on basis of religion, race, caste, sex or place of birth"
"भारतीय संविधानानुसार जात, धर्म, लिंग, जन्मस्थळ यासारख्या बाबींवरून भेदभाव करणं हा गुन्हा आहे."
तर, आता अशा पांढरपेशा गुन्हेगारांची संख्या अतिप्रचंड असणार यात शंका नाही पण माणसं बदलतात यावर माझा विश्वास असल्याने हे असे चित्रपट येणं, त्यानिमित्ताने त्यावर लिहिलं जाणं, चर्चा होणं हे गरजेचं. चित्रपट हा थ्रिलर बेस्ड घेऊन दिग्दर्शकाने ही संपूर्ण कथा फार हुशारीने हाताळली आहे. आयुषमानचा देसी बॉर्न फिरंगी ऑफिसर, मनोज पाहवा यांचा उच्च जातीचा पोलीस , कुमुद मिश्रांचा खालच्या जातीतून ( हा शब्द सुद्धा वापरावासा वाटत नाही खरं तर) वर आलेला सब इन्स्पेक्टर, जातीच्या उतरंडीत पिचलेल्या समाजाची प्रतिनिधी सयानी गुप्ताची गौरा, या लोकांचा रॉबिन हूड निषाद - मोहम्मद झीशान अयुब ही सगळी स्टारकास्ट तगडी आहे. चित्रपटाची कथा यावर काहीही लिहिणार नाहीये कारण स्पॉयलर्स दिले जाण्याची चिकार शक्यता आहे पण याचित्रपटाच्या निमित्ताने जे मुद्दे उपस्थित होतात ते महत्वाचे.