मातृदिनाच्या दिवशी मातृत्व सुख मिळणं भाग्यच...आयर्न लेडी अशी ओळख असलेल्या मनिपुरमधील मानवी अधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांना मातृदिनादिवशी जुळ्या मुली झाल्या. रविवारी बंगळुरूत मध्ये इरोम शर्मिला यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला.
'अफस्पा' कायद्याविरोधात त्यांनी तब्बल १६ वर्ष उपोषण केल होते. शर्मिला यांनी २०१७ मध्ये ब्रिटिश मित्र डेसमंड काऊंटीन्हो यांच्याशी विवाह केला. वयाच्या ४८ व्या वर्षी शर्मिला यांना मातृसुख मिळाले. दरम्यान इरोमा त्यांच्या मुलींचे फोटो लवकरच शेअर करतील.