आग विझवायला धावल्या यशोमती ठाकूर

Update: 2019-05-08 13:17 GMT

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वणी या गावाशेजारी आज दुपारी 11 वाजता भीषण आग लागली .या आगीमुळे गावामध्ये दोन संत्रांच्या बागा जळून खाक झाले. आग भीषण असल्यामुळे जंगला पासून दोन किलोमीटर पर्यंत आग पसरली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच दोन अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाले . आग विजवण्याचे प्रयत्न सुरू असून घटनेची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर घटनास्थळी दाखल झाल्या ,तसेच प्रशासनातील अधिकारी सुद्धा घटनास्थळी आले. दरम्यान या भीषण आगीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यशोमती ठाकूर यांनी स्वतः पुढाकार घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

Similar News