आईला सत्तेचा वाटा कधी मिळणार ?

Update: 2019-11-30 13:23 GMT

आई चं सामाजिक क्षेत्रात सगळीकडे कौतुक होतांना आपण बघतोय, त्याबद्दल फार कोणाच दुमत होत नाही. आईचं नाव सर्टिफिकेटवरही देण्यास आता कायद्याने मान्यता दिली आहे. फेसबुक व इतर सोशल मिडीयातही अनेक लोकांनी आपले नाव लिहिताना आईचं नाव लावलं आहे. बदलत्या सामाजिक चळवळीची पावलं आता विधिमंडळात पोचलीत. या मातृसत्ताक विचारांना आता पुन्हा एकदा राजमान्यता मिळतांना दिसत आहे. नावात तर जागा मिळाली, पण आईला सत्तेचा वाटा कधी मिळणार, याचीही प्रतिक्षा आहे.

मागील शासनाचा शपथविधी होत असतांना विनोद तावडे यांनी आपल्या आईचे नाव आपल्या शपथविधीत घेतले. महाविकासआघाडी चे सरकार स्थापन होत असतांना रोहित पवार, जयंत पाटील, नितीन राऊत यांनी आपल्या आईचे नाव घेतले आहे. याबरोबरच आदित्य ठाकरे यांनी ओळख परेड दरम्यान आपल्या आईचे नाव घेतले आहे. या निमित्ताने वेगळा ट्रेण्ड सुरु झाला आहे. पण याच असंख्य आई महिला मतदाराच्या रुपात आहेत. या सगळ्या आईंच्या रुपात असलेल्या महिलांना सत्तेत वाटा मिळणार का? हा महत्वाचा प्रश्न !!! कुठल्याही कार्यक्रमातलं होत असलेलं आईचं हे कौतुक हा तिला राजकीय वाटा देण्यात रुपांतरित होतोय का हे लवकरत स्पष्ट होईल.]

https://youtu.be/zn1aNA04-k4

 

 

-प्रियदर्शिनी हिंगे

Similar News