केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांच्या हातात अर्थसंल्पाची पोतडी ब्रिफकेसऐवजी मखमली लाल कपड्यात गुंडाळलेली होती. यामागे पश्चिमेच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचं हे प्रतिक आहे. हा अर्थसंकल्प नाही तर वहीखाते आहे, मुख्य आर्थिक सल्लागार के. सुब्रमण्यन मुख्य सुब्रमण्यन यांनी सांगितले.
अनेकदा अर्थसंकल्प बॅगेचा रंग बदलला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना त्यांनी १९९१मध्ये परिवर्तनवादी बजेट सादर केला होता. त्यावेळी त्यांनी लाल रंगाऐवजी काळ्या रंगाच्या बॅगमधून बजेट आणला होता. पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंत सिन्हा यांनीही काळ्या बॅगेतूनच बजेट आणला होता. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हातात तपकीरी आणि लाल रंगाची ब्रिफकेस दिसली होती, तर मोदी सरकारच्या पहिल्या टर्मचा अंतरीम बजेट सादर करणारे अर्थमंत्री पीयूष गोयल लाल ब्रिफकेस घेऊन संसदेत आले होते.