अर्थसंकल्प म्हणजे काय ?

Update: 2019-07-05 04:21 GMT

सामान्यांच्या डोक्यावरुन अनेकदा बाऊन्सर होणारा अर्थसंकल्प म्हणजे काय समजून घेऊयात सोप्यासरळ भाषेत. खरंतर ज्या पद्धतीने आपण आपलं घर चालवण्याचं नियोजन आपल्या पगारातून करत असतो त्याच पद्धतीने सरकार येणारं वर्ष कसं चालवायचं याचं नियोजन करत असतं. कुठून पैसा आला, कुठे पैसा गेला किती पैसा येणार आणि कुठे जाणार याचं नियोजन सरकार अर्थसंकल्पाच्या दिवशी करत असतं. या दिवशी सरकारी योजनेत तसेच अनेक वेगवेगळ्या कामात लागणाऱ्या पैशांचे नियोजन संसदेत अर्थमंत्री मांडतात. आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन मांडणार आहेत. काय आहे महिलांसाठी या अर्थसंकल्पात जाणून घेण्यासाठी वाचत रहा मॅक्सवुमन

Similar News