मुक्ता बर्वे ही मराठी चित्रपटातील एक आगळीवेगळी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘घडलंय बिघडलंय’ मधून सुरू झालेला अभिनयाचा प्रवास सिनेमा-नाटकातल्या विविध भूमिका तिने उत्तमपणे साकारलेले आहेत. ती नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारताना आपल्याला दिसते. मुक्ता ४ वर्षाची असताना तिने ‘रुसू नका फुगू नका’ या नाटकात काम केले. त्यानंतर हा प्रवास सुरु असताना रत्नाकर मतकरींच्या ‘घर तिघांचे हवे’ या नाटकात तिने भूमिका केली. पुढे तिने अनेक मराठी भाषिक चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे केली.