अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सक्तीचं नाही

Update: 2019-06-26 09:36 GMT

वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी याआधी प्रवेश घेण्यासाठी अनुसूचित जाती, जमाती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक होतं. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबली जात असून विद्यार्थ्यांमध्ये देखील प्रवेश होईल की नाही याची भीती होती. मात्र आता अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक नसल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.

त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि प्रवेश नियंत्रण समिती यांच्या बैठकीत प्रवेश घेताना देखील सक्ती केली जाणार नाही असं विनोद तावडे म्हटले आहे.

Similar News