एकीकडे महिला सक्षमीकरण होते आहे तर दुसरीकडे अमानुष प्रथा-परंपर या स्त्रियांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहेत .आपल्या समाजाला देवदासी सारख्या अनिष्ट प्रथा-रूढी समाजाला पोखरत आहेत. प्राचीन काळापासून ते आजतागायत मुलींना देवदासी केले जाते. अशीच एक घटना बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील करंजेपुल येथे घडली. सुमन अशोक पाटोळे ह्या महिला देवदासी प्रथेला बळी पडलेल्या होत्या.
पण नुकतीच त्यांची यातून सुटका झाली.चार वर्षांपूर्वी सुमन या एक महिना आजारी होत्या. यांनी एक महिना केस धुतलेच नाहीत याची जटा तयार झाली आणि नंतर याचे अंधश्रद्धेत रूपांतर झाले. त्यांना देवीकडे सोपविण्यात झाले.परंतु सुमन यांच्या घराच्या मंडळीच्या सहाय्याने रयत विज्ञान परिषदेचे समन्वयक डॉ .सुधीर कुंभार यांनी पुढाकार घेऊन सुमन चार वर्षांनी जटमुक्त झाली.मुलींच्या केसांमध्ये न विंचरल्यामुळे गुंता होऊन जट धरली जाते.
मुलां-मुलींना इसब, खरुज, नायटे यासारखे त्वचेचे रोग होणे, मूल न होणे, मूल न जगणे, घराण्याची परंपरा टिकविणे आणि देवीचा नवस फेडणे अशा विविध कारणांमुळे अज्ञानी धर्मभोळे लोक आपल्या मुलींना देवदासी किंवा मुरळ्या बनवतात.ग्रामीण भागात अशा देवदासी प्रथा अजूनही चालू आहेत.पण महाराष्ट्रातील अशा महिला जटमुक्त होणे ही काळाची गरज आहे.