एका बड्या कंपनीचे महिला कर्मचाऱ्यांना स्पेशल गीफ्ट, वर्षाला दहा ‘Period Leave’ देण्याचा निर्णय
मासिक पाळीच्या काळात महिलांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारे महिलांवर या काळात परिणाम होत असतात. या काळात महिलांनी खरंतर आराम करणं अपेक्षित असतं, पण काही कारणास्तव म्हणा किंवा नाईलाजानं ते शक्य होत नाही.
त्यासाठी मासिक पाळीसंदर्भात असलेले गैरसमज आधी दूर करणे गरजेचं आहे. यासंदर्भातील जागृतीसाठी झोमॅटो कंपनीने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. झोमॅटोने कंपनीमध्ये काम करणाऱ्या माहिला आणि तृतीयपंथी कर्मचाऱ्यांसाठी वर्षाला दहा पिरिएड्स लिव्ह म्हणजेच मासिक पाळीच्या सुट्ट्या देण्याचा निर्णय घेताल आहे. कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष दिपेंदर गोयल यांनी कर्मचाऱ्यांना यासंदर्भातील इमेल पाठवून घोषणा केली आहे.
भारतामध्ये मासिक पाळीबाबत असणारे न्यूनगंड आणि एकंदरच परिस्थिती पाहता कंपनी या निर्णयावर पोहोचल्याचं म्हटलं जात आहे.
कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष दिपेंदर गोयल यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या इमेलमध्ये “पिरिएड लिव्हसाठी अर्ज करताना लाज वाटण्यासारखं काहीच नाहीय. माझे पिरिएड्स सुरु आहेत मला सुट्टी हवी आहे असं तुम्ही इंटरनल ग्रुपवर किंवा इमेलवर मोकळेपणे यासंदर्भात सांगितलं पाहिजे.” असं म्हटलं आहे.
पुरुषांसाठी एक सांगू इच्छितो की आपल्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांची मासिक पाळी सुरु आहे सांगताना अवघडल्यासारखे वाटू नये. हा आयुष्याचा एक भाग आहे. या दिवसांमध्ये महिलांना काय काय त्रास सहन करावा लागतो याचा आपल्याला पूर्णपणे अंदाज बांधता येत नाही. मात्र जेव्हा त्या मला या काळात आराम करायला हवा असं म्हणतात तेव्हा आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मासिक पाळीच्या काळामध्ये पोटात दुखण्याची समस्या अनेक महिलांसाठी खूप त्रासदायक असते याची मला कल्पना आहे. त्यामुळेच झोमॅटोमध्ये आपल्याला एकत्र काम करण्याची संस्कृती निर्माण करायची असेल तर त्यांना या काळात अधिक आधार आणि पाठींबा देण्याची गरज आहे.” असा संदेशही त्यांनी पुरुष कर्मचाऱ्यांना दिला आहे.
https://twitter.com/Zomato/status/1292031987553722371