"राज्यशासनाला न विचारता तपास एनआयए कडे देण्यात आला आहे हा सर्व प्रकार केंद्र सरकारचा दादागिरीचा विषय आहे. अश्या प्रकारची दादागिरी हिंदुस्थानामध्ये किती सहन करायची हा देखील प्रश्नचिन्हं आहे आणि यावर आवाज उठवला जाईल"
असं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराचा तपास राज्य शासनाला सांगता एनआयएकडे सोपवण्यात आला यावरून महाविकास आघाडीकरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. केंद्र सरकारने एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला असून यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना माहिती न देताच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.
https://youtu.be/0QGwl_MlrX4